जीवन प्रकाश पब्लिक स्कूल कडून पोलीस बाधंवाना मानाचा सलाम
जयसिंगपूर : जीवन प्रकाश बहुउद्देशीय सेवाभावी संस्था
संचलित जीवन प्रकाश पब्लिक स्कूल जयसिंगपूर कडून पोलीस कर्मचारी बाधंवाना अभिवादन
करण्यात आले.
Jeevan Prakash Public School Jaysingpur |
आपल्या सुक्षिततेसाठी अहोरात्र पोलीस
यंत्रणा काम करत आहेत. या त्यांच्या कामाला अभिवादन करण्यासाठी जीवन प्रकाश संस्थेचे संस्थापक चेअरमन
डॉ. प्रकाश दिपंकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोकुळ शिरगांव पोलीस ठाण्याचे सहा.
पोलीस निरिक्षक सुशांत चव्हाणसाहेब व सर्व पोलीस कर्मचारींचे अभिवादन करून
सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
यावेळी जीवन प्रकाश संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी अभिता कोठावळे
यांनी सर्व पोलीस कर्मचारींना ओवाळणी करून म्हणाले, आपली सेवा बजावत
असताना स्वत:ची काळजी घ्या. तुम्ही आहात म्हणुन
आम्ही सर्व नागरिक सुरक्षित आहोत. आम्ही नागरिक म्हणुन
शासनाच्या नियंमाचे पालन करून कोरोना व्हायरसला हटवुया, असे
म्हणाले.
यावेळी गोकुळ शिरगांव पोलीस ठाण्याचे पोलीस
बाजीराव जाधव, नागर गोजे, सर्व पोलीस कर्मचारी व जीवन
प्रकाश संस्थेचे करवीर तालुका उपाध्यक्ष सात्ताप्पा कांबळे उपस्थित होते.